संगमनेर किशोर वाघमारे नुकत्याच होऊ घातलेल्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.मैथिली सत्यजित तांबे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाच्या वतीने संगमनेर येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दर्शविला असल्याचे पत्र पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर रोहम व तालुकाप्रमुख ॲड.रमेश बनसोडे यांनी नुकतेच नाशिक पदवीधर विधान परिषदेचे आमदार युवा नेते सत्यजित तांबे यांच्याकडे सुपूर्त केले आहे
जिल्हाप्रमुख सुधाकर रोहम यांनी पाठिंबा पत्र देत पक्षाचे वरिष्ठ नेते पक्षप्रमुख डॉ.राजेंद्र गवई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या आदेशान्वये विचारविनिमय करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्ष संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर शहरातील
नगर परिषद निवडणुकीत सेवा समितीच्या सर्व उमेदवार म्हणजे एक नगराध्यक्ष व ३० नगरसेवक पदासाठी उभे असणारे सर्व उमेदवार यांना आमच्या पक्षाचा व तमाम बौद्ध समाजाचा जाहीर पाठिंबा असून सर्व प्रभागांमध्ये आमच्या पक्षाचे शाखाप्रमुख शहराध्यक्ष शहर महिला आघाडी प्रमुख सर्वजण कामाला लागले आहे.
सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास व्यक्त करत संगमनेर शहर येथे रिपब्लिकन पक्ष गवई गटाच्या वतीने शहर पदाधिकारी व जिल्हा व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल अंबर येथे पार पडली.
या बैठकीला अध्यक्षस्थानी संगमनेर तालुका अध्यक्ष ॲड रमेश बनसोडे शहर प्रमुख राजाभाऊ अहिरे महिला आघाडी प्रमुख रमा तपासे ज्येष्ठ नेते सुरेश देठे राजेंद्र घायवट तुकाराम जाधव अशोक गायकवाड श्री.गायकवाड गोरक्षनाथ बनसोडे सोमनाथ खरात बाळासाहेब नाना गायकवाड साहेबराव यादव दादू यादव जालिंदर बोरुडे उत्तम बनसोडे संगमनेर शहरातील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
