अनपेक्षित कृती आणि हालचालीमुळे बोगस अधिकारी कल्पना भागवत पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय

Cityline Media
0
संभाजीनगर प्नतिनिधी स्वतःचे घर असताना पंचतारांकित हॉटेलात सहा महिने मुक्काम ठोकणारी बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानच्या पेशावर आर्मीसह अफगाण दूतावास व अन्य ११ इंटरनॅशनल नंबर सापडल्याने सुरक्षायंत्रणा हादरली आहे.
तिने दिल्ली,राजस्थान, मणिपूर येथे वारंवार भेटी दिल्याने तसेच - नुकत्याच झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा तपास - अतिशय गंभीर व संशयास्पद ठरत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले.

खाडाखोड केलेले आधार कार्ड, बनावट आयएएसची २०१७ सालची यादी बाळगून राहणाऱ्या कल्पना - भागवतला सिडको पोलिसांनी अटक केली होती. तिची पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा,आयबी,एटीएस,

सीआयडीने कसून चौकशी सुरू आहे. नुकतेच पोलीस निरीक्षक अतुल येरमे,तपास अधिकारी एपीआय योगेश गायकवाड, जमादार दीपक देशमुख यांच्या पथकाने तिला न्यायालयात हजर केले. तेव्हा पोलिसांनी विविध धक्कादायक मुद्दे मांडले.तसेच सरकारी वकील जरीना दुर्रानी यांनी सांगितले की, स्वतःचे पडेगाव भागात घर असताना कल्पना सहा महिन्यांपासून हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये संशयास्पदरीत्या राहत होती. ती राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत होती,

हा घातक प्रकार आहे.दिल्ली येथे नुकताच बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे.

हिच्याकडे संशयास्पद चॅटिंग, आंतरराष्ट्रीय नंबर्स मिळणे याची चौकशी करणे गरजेची आहे. स्वतःला आयएसएस अधिकारी असल्याचे सांगून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे हे कृत्य असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.तिच्या चौकशीसाठी पोलिसांनी वाढीव दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर

यांनी मंजूर करत कल्पनाची ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

अपना डीलर पाकिस्तान में हैं तिचा अफगाणी मित्र अशरफचा पाकिस्तानमधील भाऊ गालिब यमासोबतचे चेंटिंग तिने डिलिट केले असले तरी अपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना, असा मजकूर असलेला चॅटिंगचा स्क्रीन शॉट सापडला आहे. त्यामुळे कल्पना भागवतचा पाय आणखी खोलात गेला आहे. लोकसेवा आयोग २०१७ ची बोगस निवड यादी मनोज लोढा आणि दत्तात्रय शेटे यांनी तयार करून दिल्याची कबुली कल्पनाने दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांचा

सहभाग निष्पन्न झाल्यास आरोपींची संख्या वाढणार आहे. दोघांना चौकशीसाठी  बोलविण्यात येणार आहे.

कल्पना भागवतने दिल्ली, जयपूर,उदयपूर,राजस्थान, मणिपूर अशा बऱ्याच ठिकाणी विमानाने वेळोवेळी प्रवास केल्याचे समोर आले आहे.ती तिथे कोणाला भेटली ? तिचा उद्देश काय होता,याचा तपास होणार आहे. घर झडतीत संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या लेटर हेडवर कल्पना हिला आयएएस संबोधून तिने सामाजिक व धार्मिक कार्य चांगल्या पध्दतीने केले असल्याचे प्रमाणपत्र सापडले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!