संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील ग्रामपंचायत निळवंडे अंतर्गत येणाऱ्या कानिफनाथ वस्ती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा संचार दिसून येत आहे त्यामुळे या परिसरामध्ये शाळेत जाणारे विद्यार्थी,नागरिक व परिसरात ये जा करणारे शेतमजूर तसेच परिसरातील सर्वच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच कानिफनाथ वस्ती परिसरातील डॉ.दिलीप रामभाऊ पवार आणि निवृत्ती रामभाऊ पवार यांच्या घरापासून काही अंतरावर बिबट्या पकडण्यासाठी वन विभागामार्फत पिंजरा लावण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी त्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांनी केले.
या परिसरामध्ये असलेल्या बिबट्यांचा मुक्त संचारामुळे बिबट्याच्या दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे.या भीतीच्या वातावरणावर उपाय म्हणून या ठिकाणी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत निळवंडे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे यांचे मार्फत विशेष पाठपुरावा करण्यात आला होता वनविभागाने तात्काळ दखल घेऊन नुकतेच या ठिकाणी पिंजरा लावला वनविभागाने तातडीने घेतलेल्या खबरदारीच्या उपायाबद्दल वनविभागाचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
