पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखेंचे संगमनेर शहरातील नागरिकांना आवाहन
झरेकाठी सोमनाथ डोळे शहरातील लोकांना विकास हवा आहे.महायुती सरकारने शहरासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम निश्चित होईल, विरोधकांना चाळीस वर्षे दिली आम्हाला फक्त पाच वर्ष द्या असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी केले.
मंत्री विखे पा.यांनी महायुतीच्या प्रचाराच्या निमिताने शहरातील प्रत्येक प्रभागात जावून नागरीकांच्या भेटी घेतल्या.प्रभागातील समस्या जाणून घेतानाच,शहर विकासाच्या दृष्टीने केलेल्या सूचनांचे स्वागत केले.अनेक प्रभागात वर्षानुवर्ष असलेल्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत.
निवडणुक संपताच यासंदर्भात शासन स्तरावर निश्चित कार्यवाही करून न्याय देण्याचे आश्वासन मंत्री विखे यांनी दिले.रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीची अंमलबजावणी होणार असली तरी सद्य परिस्थितीत आयटीआय झालेल्या युवकांना शिर्डी येथील औद्योगिक वसाहती मध्ये संधी आहे.महीला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील शिवाजी नगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्याच्या एका युवकांने केलेल्या सूचनेवर बोलतांना केवळ नावच नाहीतर या नावाची कमान उभी करू.अतिक्रमण म्हणून नोंदणी असलेल्या घर मालकांना दिलासा देण्यासाठी सर्व समावेशक धोरण घेण्याबबात प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे म्हणाले.
आमदार अमोल खताळ म्हणाले की शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे काम पालकमंत्री ना विखे यांच्या माध्यमातून होणार आहे.एक वर्षापुर्वी तालुक्यातील जनतेने विकासासाठी परीवर्तन घडवले. सामान्य नागरीक महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रत्येक प्रभागात यापुर्वी पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले
याप्रसंगी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ भाजप ज्येष्ठ नेते श्रीराम गणपुले कैलास वाकचौरे डॉ.अशोक इथापे जनार्दन आहेर सिद्राम दिड्डी अभिजीत पुंड दिनेश फटांगरे शशांक नामन प्रवीण दीड्डी अक्षय वर्पे,अशोक खेमनर, कविता पाटील,गोकुळ दिघे, सोमनाथ डोळे,यांच्यासह सर्वच प्रभागातील महायुतीचे उमेदवार आणि प्रभागांमधील कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.
