आश्वी परिसरात नदी पात्रातून वाळू तस्करांनी केले साडे सात लाखांच्या वाळूचे उत्खनन

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर नगरपालिका निवडणुकीत महसूल प्रशासन व्यस्त असतांना आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये प्रवरा नदीपात्रात वाळु तस्करांनी हैदोस घातला असुन या तस्करांवर महसूल पथकाने शनिवारी रात्री कारवाई करत सुमारे साडे सात लाखाचा ऐवज जप्त करून आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
संगमनेर तालुक्याचा पुर्व भागातील गावांमध्ये प्रवरा नदीपात्रातुन वाळुतस्करांनी अवैध रित्या वाळु उपसा सुरु केला असून वाळु तस्करांकडुन सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्र‌माणात लुट सुरु झाल्याने शासकीय अवैध गौणखनिज वाहतूक आणि उत्खननावर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाने शनिवारी उशिरा रात्री छापा मारत १ विनानंबर टिप्परसह शासकीय वाळू ताब्यात घेतली.

प्रसंगी अंधाराचा फायदा घेऊन दोन इसमांनी घटना स्थळावरून पोबारा केला. धोंडीबा बुधा भालचीम वय ५७ मंडळ अधिकारी—संगमनेर बुद्रुक हे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अवैध वाळू उत्खननावर नजर ठेवत आहेत. शनिवारी दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२० वाजता मंडळ अधिकारी भालचीम, ग्राममहसूल अधिकारी राजेंद्र धोंडीराम पवार (सुकेवाडी) व अरबाज इनामदार (राजापूर) हे आश्वी बु. गावठाणाच्या उत्तर बाजूस—शाळेच्या पाठीमागील,मांची रोड परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी पिवळ्या रंगाचा हुड असलेला विना नंबरचा संशयित टिप्पर दिसताच पथकाने त्यास थांबवले.

तपासणी दरम्यान टिप्परच्या मागील हौदात सुमारे दोन ब्रास वाळु आढळून आली.वाहतूक परवाना मागितल्यावर, टिप्परमध्ये असलेल्या दोघा इसमांनी परवाना नाही असे कबूल केले.मात्र पथक अधिक चौकशी करत असतानाच दोघेही अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पाठलाग करूनही ते मिळून आले नाहीत. त्यानंतर पथकाने सदर टिप्पर आश्वी पोलीस ठाण्यात जमा केला.

जप्त केलेल्या वाहन व वाळूची अंदाजित एकूण किंमत सात लाख छप्पन हजार चारशे रुपये इतकी सांगितली जाते. या वेळी पथकाने पिवळ्या रंगाचा हुड असलेला विना नंबर टिप्पर  चेसी क्रमांक एम एच टी ८६३०३५७ सी वो ५४७७ अंदाजे किंमत सात लाख पन्नास हजार, शासकीय वाळू २ ब्रास अंदाजे  किंमत सहा हजार चारशे एकूण सात लाख छप्पन हजार चारशे रुपये असा ऐवज जप्त करुन आश्वी पोलीसांच्या ताब्यात दिला.

या दोघा अनोळखी इसमांनी शासकीय वाळू विनापरवाना वाहतूक करत पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे स्पष्ट झाल्याने मंडळ अधिकारी भालचीम यांनी आश्वी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास सुरू केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!