दिग्जजांना बाजूला सारून सनदी अधिकारी राजेश अग्रवाल राज्याचे मुख्य सचिव

Cityline Media
0
सरकारचा मोठा निर्णय                 .                  

ठाणे विशाल सावंत- केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याचे मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.राजेश अग्रवाल यांनी केंद्रीय पातळीवर आपल्या कामाचा दिमाखदार ठसा उमटवला. त्याचीच दखल घेऊन दिग्गजांना बाजूला सारून राज्य सरकारने त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. पुढच्या दोन दिवसात त्यांनी कार्यभार स्वीकारावा,असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले मुख्य सचिव राजेश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून राजेश अग्रवाल हे कार्यभार स्वीकारणार आहेत.राजेश अग्रवाल हे केंद्रात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील अपंग व्यक्ती विभागाचे सचिव होते. अग्रवाल हे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

राजेश अग्रवाल हे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते जवळपास एक दशकापासून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी वित्तीय सेवा,आदिवासी व्यवहार, कौशल्य विकास, पेट्रोलियम आणि सामाजिक कल्याण या महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाराष्ट्रात त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असून,माहिती तंत्रज्ञान, लेखा आणि कोषागार विभागांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अग्रवाल मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारणार

अग्रवाल पुढील आठवड्यात महाराष्ट्र शासनात रुजू होणार असून, त्यांचा निवृत्तीचा कालावधी नोव्हेंबर २०२६ मध्ये आहे.ते मुख्य सचिव झाल्यानंतर १९९८९, १९९० आणि १९९१ बॅच मधील काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना राज्य प्रशासनाचे सर्वोच्च पद मिळण्याची संधी गमवावी लागू शकते!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!