आश्वी खुर्द ग्रामपंचायतीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड “समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे” या भावनेने संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीत जागतिक दिव्यांग दिन (३ डिसेंबर) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात दिव्यांग नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या त्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले जाईल,असे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण इल्हे यांनी शासनाच्या विविध दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती देताना “सरकारकडून उपलब्ध असलेल्या योजनांचे योग्य लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे” असे सांगितले.

ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नातून गावातील ५० दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी २,००० रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले.

लोकनियुक्त महिला सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड यांनी आपल्या मनोगतात “दिव्यांग बांधवांचे प्रश्न हे ग्रामपंचायतीच्या कार्ययोजनेचे केंद्रबिंदू आहेत.आगामी काळातही रोजगार,आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी ठोस पावले उचलली जातील” असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला उपसरपंच बाबासाहेब भवर,सदस्य सोपान सोनवणे,संजय भोसले,सागर भडकवाड,कल्पना शिरसागर, जनाबाई शिंदे,सुवर्णा सातपुते, संगिता बर्डे,आशा मुंतोडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

यावेळी विकास गायकवाड,संतोष भडकवाड, संजय गायकवाड,विशाल भवर,विष्णू दातीर,संजय साबळे, माया सोसे, सलीम शेख,संतोष साळवे, लहानू शिरतार, पंडित बालसाने, रमेश पाचारणे, कल्पना सातपुते, अरुण मुंतोडे यांच्यासह गावातील असंख्य दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष उजाळा दिला.

गावातील सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारा हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी दिलासा देणारा ठरला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!