लोणी ज्ञानेश्वर साबळे एकही झाड न तोडता कुंभमेळा भरविण्यात येतो कुंभमेळ्यासाठी तपोवन अतिशय दुर्मिळ असे ठिकाण आहे त्यास परंपरेत आपल्या दैवतचा वारसा देखील लाभलेला आहे.प्रभू श्रीराम येथे आल्याची साक्ष ती वृक्ष आजही आपल्याला देतात या निर्णयाच्या विरोधात बोलणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांना महाराष्ट्रातील नागरिक,वृक्षप्रेमी सिने कलावंत पाठिंबा दर्शविला पाहिजे असे मत सिने अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दिग्दर्शक पंडित पुढे बोलताना म्हणाले की आज तपोवनातील वृक्ष तोडण्याचा अट्टाहास कशासाठी? तसेही साधू संत हे अभयारण्य जंगल डोंगर दर्यातच राहतात त्यांची कुठलीही मागणी नसताना आपण वृक्षाचे महत्व ओळखले पाहिजे ते वृक्ष आजचे नसताना ते कित्येक वर्षांपूर्वीचे वृक्ष आहे याची आपण ही दखल घेतली पाहिजे आज काल वनांची संख्या बेसुमार वृक्षतोडीमुळे कमी होत चालली असताना वन्य प्राणी हिंस्र श्वापदाची मानवी वसाहतीकडे आगेकूच होत आहे.
सरकारने वन बिबट्यांची वाढती संख्या ही लक्षात घेणे गरजेचे आज ते मानवी वसाहतीत रहिवासाला येवु पाहत आहेत माणसांवरती कित्येकांनी हल्ले देखील केले आहे.
प्राण्यांकडे लक्ष न देता वन कसे तोडता येईल याकडे जास्तीचे लक्ष केंद्रित केले आहे आम्ही पण वृक्ष प्रेमी सरकारकडे हिच मागणी करणार आहे की तपोवनातील एकही वृक्ष न कापता कुंभमेळावा भरवावा.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
आमच्या साधू संतांना या वृक्षापासून नैसर्गिक हवा हे कुठल्याही वातानुकूलित यंत्रापेक्षा लाभदायक असेल याकरिता नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात बोलणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत राहुन पाठिंबा दर्शविला पाहिजे.
तपोवनातील काही वृक्ष तोडीच्या निर्णयाविरोधात त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील वृक्षप्रेमी कलावंतांनी पाठिबा दर्शविला पाहिजे तसेच ह्या निर्णयाला विरोध देखील केला पाहिजे आपला वृक्ष म्हणजे आपला ऑक्सिजन आज त्याची तोड होऊ नये भविष्यात ऑक्सिजन विकत घेऊन घ्यायची वेळ येईल त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सोबत उभे राहण्याची आज गरज आहे असे परखड मत अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.
