एक खिडकी प्रकल्प आणि ना हरकत दाखला पाच वर्षाचा देणे बाबत सकारत्मकता !
झरेकाठी सोमनाथ डोळे शहरातील खाजगी रूग्णालयांना बाॅम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत नोंदणी देतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्याने आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून आरोग्य सहसंचालकांनी एक खिडकी प्रकल्प सुरू करण्या बरोबरच वैद्यकीय व्यावसायिकांना ना हरकत दाखला पाच वर्षाचा देण्यासंदर्भात नगरविकास विभागा समवेत बैठक घेवून निर्णय करण्यास सकारत्मकता दर्शवली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने संगमनेर शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी विधान भवनाच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत प्रामुख्याने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या रूग्णालयांना बाॅम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत नोंदणी देताना येणाऱ्या अडचणी आमदार खताळ यांनी बैठकीमध्ये निदर्शानास आणून दिल्या होत्या.
बैठकीत झालेल्या निर्णायानूसार वैद्यकीय व्यावसायिकांना अडचणी येवू नयेत म्हणून एक खिडकी प्रकल्प राबविण्यात यावा.नगरपालिका हद्दीत नगर पालिका हद्दीत ना हरकत प्रमाणपत्र देण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी नगर विकास रचना विभाग यांच्याशी समन्वय साधून ना हरकत देण्याच्या तरतुदी मध्ये बदल करणेबबात समन्वय साधण्यात यावा.वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी दिलेला ना हरकत पाच वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात यावा.तसेच नगर विकास विभाग यांनी पुर्वी बांधलेल्या हाॅस्पिटल दंड वसूल करून सदर इमारती नियमित करण्याची तरदूत अंतर्भूत करण्याची आ.खताळ यांनी केलेल्या मागणीबाबतही आरोग्य विभागाने सकारत्मकता दर्शवली आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यातील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी नगर विकास विभागा समवेत तातडीने बैठक घेण्याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाच्या सहसंचालक डाॅ.सुनिता गोल्हाईत यांनी दिल्या आहेत.
