भिमसैनिकांचा उसळला संताप
मुंबई अमोल शेळके छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या; मात्र या गाड्यांची वेळ सतत ढासळल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी १३:३० वाजता सुटणारी विशेष रेल्वे तब्बल जवळपास दुपारी ३ वाजता सोडण्यात आली. त्यामुळे नागपूरकडे जाणारे अनेक प्रवासी,तसेच मनमाड मार्गे औरंगाबादकडे जाणारे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, काही नियमित गाड्यांना प्राधान्य देत विशेष गाड्या मुद्दाम उशिरा सोडल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.परिणामी मनमाडच्या पिछाडीस गाडी थांबून दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. संतप्त प्रवाशांनी (सुमिट /मनमाड) स्थानकावरील स्टेशन मास्तरांची भेट घेऊन विलंबाचे कारण विचारले असता, “आम्ही काही करू शकत नाही,” असे उत्तर मिळाल्याची माहिती समोर आली.
या सर्व प्रकारामुळे “हे जाणूनबुजून करण्यात आले काय?” असा सवाल प्रवाशांकडून जोरदारपणे उपस्थित करण्यात आला आहे. अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करताना म्हटले, “आम्हाला विशेष गाड्या नकोत, पण गाड्या वेळेवर सोडा…!”
प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, या गोंधळाबाबत तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
