आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर यांच्या ८६ व्या स्मृति दिनानिमित्त कलावंतांची मानवंदना
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
आणि आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.ग्रामपंचायत हिवरगाव पावसा येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
भिम शाहीर मधुकर भालेराव व गायक हरिचंद्र भालेराव यांनी कलेच्या माध्यमातून सुमधुर भीम गीतांनी महामानवास मानवंदना दिली. तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना कलेच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या कडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वृक्षमित्र गणपत पावसे म्हणाले की महिलांच्या न्याय हक्कासाठी ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी न्याय मिळाला नाही म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे जगातील एकमेव नेते विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. राज्यघटनेमुळे भारत देश प्रगतीपथावर आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे भारतातील जनता सुखी आणि समाधानी आहे.बाबासाहेबांचे आपल्यावरील ऋण विसरू नये.विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा या उपलब्ध होत आहेत ही बाबासाहेबांची देण आहे याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी आणि उत्कृष्ट अभ्यास करून यश संपादन करावे गावाचे नाव उज्वल करावे असे अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी हिवरगाव पावसा येथील आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांचे कलाक्षेत्रातील बहुमूल्य योगदानामुळे हिवरगाव पावसा गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. १९ व्या शतकात वर्ग व्यवस्थेचा पगडा असताना रूढीचे बंधने झूकारून पवळा भालेराव यांनी तमाशा लोककला क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकले आणि कला क्षेत्रात महिलांसाठी आदर्श व प्रेरणा निर्माण केली.त्यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त हिवरगाव पावसा ग्रामपंचायतने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे असे गणपत पावसे यांनी अभिवादन पर म्हटले आहे.
यावेळी सरपंच सुभाष गडाख,भाजपाचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,ज्येष्ठ संपादक
यादवराव पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,ग्रामसेवक हरिष गडाख,भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे,प्रा.बाबुराव पावसे,प्रा. आप्पासाहेब गडाख,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,
डॉ.पवनकुमार गायकवाड, नामदेव पावसे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.पी. रहाणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अक्षय खतोडे,हरिभाऊ सहाणे,मंगल बिडवे,यांच्यासह संजय भालेराव,राजेंद्र दरोळे,सुयोग भालेराव,रवींद्र दारोळे,बच्चन भालेराव, समाधान भालेराव,अंकुश कोळगे,मुकेश दरोळे,प्रवीण
