श्रीरामपूर दिपक कदम जुन्नर येथील समर्थ पाॅलिटेक्निल काॅलेजचे प्राचार्य डाॅ.अनिल साहेबराव कपिले हे कार्यरत असून त्यांना नुकतीच गुजरात येथे पीएचडी प्रदान केली आहे.
डाॅ.अनिल कपिले यांनी आर.के. इंटरनॅशनल विद्यापीठ गुजरात या ठिकाणाहून "डीप लर्निंगचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांचा दर्जा बॅटरी व्यवस्थापन दर्जा ऊर्जा कार्यक्षमता" यांचा अत्याधुनिक "डिप लर्निंग माॅडेलचा अभ्यास करून ऊर्जा वापराचे भाकित अचूक करता येते हे प्रभावीपणे सिध्द केले.
याकामी डाॅ.कल्पेश वडरा डायरेक्टर आणि प्रोव्हाइस चान्सलर राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी गांधीनगर व डाॅ.अमित लाठीग्रा व्हाॅईस चान्सलर आर.के.युनिव्हर्सिटी राजकोट, गुजरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच अनिल कपिले ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा श्रीरामपूर यांचे सुपुत्र आहेत.त्यांचे शिक्षकमित्र व विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
