श्रीरामपूर मध्ये 'प्रारण' चित्रपट प्रदर्शित

Cityline Media
0
-श्रीरामपूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत तिन्ही शो केला हाऊसफुल्ल 

श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्राची ओळख सामाजिक जाणीव,मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख संगम साधणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टी मुळे अधिक भक्कम झाली आहे.याच परंपरेत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून प्रथमच सद्य परिस्थितीतील एक अगळ्या  वेगळ्या विषयावर आधारित मराठी शैक्षणिक चित्रपट ‘प्रारण’ तयार झाला असून,तो लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
मयूर परदेशी फिल्म्स आणि डी.ए.फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘प्रारण’ या चित्रपटाचे लेखन,दिग्दर्शन, गीतलेखन व संकलन मयूर मच्छिंद्र परदेशी यांनी केले आहे. शैक्षणिक मूल्ये,सामाजिक भान आणि सकारात्मक संदेश यांची प्रभावी मांडणी करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

श्रीरामपूर येथील खासदार गोविंदराव आदिक सभागृहात ‘प्रारण’ या शैक्षणिक चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडला.या ऐतिहासिक प्रसंगी श्रीरामपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी ज्येष्ठ कवी बाबासाहेब सौदागर,वंदना मुरकुटे,शशांक रासकर,उद्योजक अशोक थोरे,अमोल कदम,डॉ.संजय दुशिंग, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या विषयाची, मांडणीची आणि सामाजिक उपयुक्ततेची विशेष प्रशंसा केली.

याप्रसंगी निर्माते मयूर परदेशी. चित्रपटाचे मार्गदर्शक डॉ.एजाज शेख.ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचे अनिल भोसले,डॉ.सागर पाफाळे,मयूर खराटे, संजीवनी थोरात,उज्वल कुलकर्णी,बाल कलाकार रोहन वाघमारे,तसेच चित्रपटातील सर्वच कलाकारांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

श्रीरामपूरमध्ये प्रथमच अशा स्वरूपाचा शैक्षणिक चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडल्याने हा क्षण शहरासाठी ऐतिहासिक ठरला.स्थानिक स्तरावरून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणारा ‘प्रारण’ हा चित्रपट शैक्षणिक चित्रपटांच्या प्रवासात नवे मापदंड निर्माण करेल,असा विश्वास प्रेक्षकांनी व्यक्त केला.शैक्षणिक दृष्टिकोनातून समाजाला सकारात्मक दिशा देणारा ‘प्रारण’ प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा,असे आवाहन चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र परदेशी यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!