वरवंडी संपत भोसले जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वरवंडी शाळा येथे नुकत्याच उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ठोकळ केंद्रप्रमुख श्रीमती अशा घुले तसेच प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य श्री.तळेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब वर्पे, उपाध्यक्ष सौ.कविता भोसले तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बस्ते हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा
त्यांचा शारीरिक भौतिक व मानसिक विकास व्हावा व या ठिकाणी मुलांमधून भावी कलाकार घडावेत म्हणून दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा होत असतात या स्पर्धा प्रथम शाळा पातळीवर आयोजित केल्या गेल्या त्या मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र पातळीवर झाली आणि आता खाली दिलेल्या विद्यार्थ्यांची बीट पातळीवर निवड झाली आहे
वकृत्व स्पर्धा (बालगट) हर्ष मेहेरखांब (इयत्ता पहिली) प्रथम क्रमांक समूहगीत स्पर्धेमध्ये वरवंडी शाळेचा (प्रथम क्रमांक) वैयक्तिक गीत गायन स्पर्धा, किशोर गट, संघमित्रा मेहेरखांब इयत्ता चौथी(प्रथम क्रमांक)
कथा व गोष्ट सादरीकरण (प्रथम क्रमांक )संघमित्रा मेहेरखांब चौथी वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत राधिका कुलकर्णी, बालगट ( तृतीय क्रमांक)
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांना व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले.विद्यार्थ्यांची बीट पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल केंद्रातील शिक्षकांच्या वतीने शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती.ठोकळ ,केंद्रप्रमुख,
श्रीमती.घुले व केंद्रातील शिक्षकांच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य जि.प.शाळा वरवंडी तसेच जि.प.प्राथमिक शाळा वरवंडी शिक्षकवृंद पालक व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन खरशिंदे शाळेचे मुख्याध्यापक श्री.गागरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्रीमती. धुमाळ अर्जुन दातीर तसेच रमेश कापडी यांनी मोलाचे सहकार्य केले.
