म्हसरूळ मधील अस्मिता रेसिडेन्सीत घरफोडी करून चार तोळे,रोकड केली हडप

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे -कुलूप तोडून लाकडी कपाटातील चार तोळ्यांचे सोन्याचांदीचे दागिने - व रोकड असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली.
फिर्यादी सोनल जितेंद्र गवळी (रा.अस्मिता रेसिडेन्सी, शिवसमर्थनगर, म्हसरूळ) यांचे पती - कामावर गेलेले असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फिर्यादी या राहत्या घरास कुलूप लावून

मुलासोबत एरिगेशन कॉलनी येथे त्यांच्या शॉपवर गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने गवळी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट उघडून त्यात असलेले ४५ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ७० हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, ३२ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, ३५ हजार रुपये किमतीचे कानातील आठ ग्रॅम वजनाचे कानातील लोंबते टॉप्स,

साडेतीन हजार रुपये किमतीच्या चांदीच्या बांगड्या, साडेआठ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन समया, सहा हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन लोटे व फुलपात्रे, ११ हजार ३०० रुपये किमतीची चांदीची चेन, आठ हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, चार हजार रुपये किमतीच्या कानातील रिंगा, २२ हजार रुपये किमतीचे कानातील चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, ३५ हजार रुपये किमतीची १२ मनगटी घड्याळे, दीड हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, साडेतीन हजार रुपये किमतीच्या दीड ग्रॅम वजनाच्या

सोन्याच्या रिंगा, २२ हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, पाचशे रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, सहा हजार रुपये किमतीचा चांदीचा लक्ष्मीचा कॉईन, १२०० रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व ७४ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!