स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
संगमनेर प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांना जिल्ह्यामध्ये अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमाविरुध्द कारवाई करणेबाबत नुकतेच आदेशित केले होते.
या आदेशान्वये पोलिस निरिक्षक किरण कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके,प्रमोद जाधव, सतिष भवर, सुनिल मालणकर, चालक महादेव भांड अशांचे पथक तयार करुन अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमाविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
नुकतेच हे पथक लोणी पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमाबाबत माहिती काढत असताना. पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांना एक इसम त्याचे कडील पांढ-या रंगाच्या स्विप्ट कारमधुन नाशिक येथुन चंदनाची लाकडे विक्री करण्याचे उद्देशाने नांदुर शिंगोटे मार्गे श्रीरामपुरकडे येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानंतर पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांनी ही माहिती पथकास सांगुन कारवाई करणे बाबत कळविले.
त्यानंतर पथकाने तळेगाव ते लोणी रोडवर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटरच्या पुढे सापला लावुन थांबले असतांना, तळेगाव कडुन लोणी रोडने एक पांढ-या रंगाची स्विप्ट कार येतांना दिसु आली. तेव्हा पथकाने सदर वाहनास इशारा करुन थांबवुन, पोलिसांची ओळख सांगुन वाहनातील इसमास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव १) हनुमंता भिमा मोरे, (वय -४५ वर्षे रा. उंबरगांव ता, श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.
त्यास दोन पंचासमक्ष त्याचे व ताब्यातील कारची झडतीचा उद्देश सांगुन झडती घेतली, त्याचे ताब्यातुन ६०,००० रु कि.चे ३० किलो. चंदनाची लाकडे, ५,००,००० कि.ची एक मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट कार, १०,०००रु.कि.ची एक मोबाईल असा एकुण ५,७०,,००० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यास चंदनाची लाकडे कोठुन आणली आहे, याबाबत विचारले असता त्याने चंदनाची लाकडे २) उत्तम नारायण पवार रा. पळसे साखर कारखाना शेजारी, ता.सिन्नर जि.नाशिक (फरार)यांचेकडुन विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले आहे.
या आरोपी विरूध्द लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ६५९/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) ,भारतीय वन कायदा १९२७ चे कलम ४२ सह महाराष्ट्र वन अधीनियम कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास लोणी, पोलीस ठाणे हे करीत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी याबाबत कारवाई केली.
