कोपरगावातील लौकी येथे वाळू माफियाकडून ४,०५००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कोपरगाव प्नतिनिधी तालुक्यात वाळू तस्करांचा वाढता सुळसुळाट लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत नुकतेच आदेशित केले होते.
या आदेशान्वये पोलिस निरिक्षक किरण कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके,भिमराज खर्से,राहुल डोके,प्रमोद जाधव, सतिष भवर, सुनिल मालणकर, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेकामी नुकतेच रवाना केले होते.

हे पथक कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त खबऱ्या मार्फत कुणकुण लागली की, इसम नामे रमेश जगन्नाथ मोरे हा पुणतांबा चौफुली ते वैजापुर रोडवरुन त्याचे ताब्यातील ट्रँक्टर व ट्रॉलीने लौकी गावाचे शिवारातील खटकडी ओढ्याच्या पात्रातुन चोरुन वाळु उपसा व वाहतुक करत आहे.

त्यानंतर पथकाने तात्काळ पुणतांबा चौफुली कडुन वैजापुर कडे जाणारे रोडने गस्त करीत जात असतांना,पथकास समोरुन एक टॅक्टर ट्रॉली येत असतांना दिसली.तेव्हा पथकाने टॅक्टर थांबवून पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये वाळु असल्याचे दिसुन आले.तेव्हा चालकास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) रमेश जगन्नाथ मोरे (वय- ४२) वर्षे रा.पढेगांव ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे वाळु वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याने पंचासमक्ष १) ४,००,०० किंमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली २) ५००० रु कि.ची अर्धा ब्रास वाळु असा एकुण रु. ४,०५,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या आरोपीविरूध्द कोपरगांव तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर ‌न.३४४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा पुढील तपास कोपरगांव तालुका, पोलीस ठाणे हे करीत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!