लोणी ज्ञानेश्वर साबळे राहाता तालुक्यातील लोणी येथील सुप्रसिद्ध सराफ तसेच सुवर्णकार समाजाचे मा.अध्यक्ष हरिष देवराम माळवे तसेच संत नरहरी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट लोणी विश्वस्त यांना राहूरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचे वतीने दिला जाणारा उत्कृष्ट सोनार पुरस्कार नुकताच जाहीर झाला असुन,त्यांना सोसायटीच्या वतीने निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले तसेच यावेळी सोनार समाजातील अनेकांनी श्री.माळवे यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
यावेळी अनेक सुवर्णकार समाजातील व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या हरिष माळवे यांचे काम निश्चितच अभिनंदनीय आहे.असे मत रंगनाथ उदावंत यांनी व्यक्त केले.
हरीश माळवे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असुन त्यांचा परखड स्वभाव व निस्वार्थ भावनेतुन सामाजिक कार्य असते,असे राष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख रवी माळवे म्हणाले तसेच कौटुंबिक जबाबदारी सभाळून आपल्या सराफी व्यवसायातून वेळ काढून समाजिक कार्यात सर्वाना सोबत घेऊन समाज कार्यात हरीष माळवे नेहमी पुढे असतात असे मनोगत विजय माळवे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्ञानेश्वर साबळे,सोमनाथ आहेर,गुरुनाथ बोराडे, सुभेदार शेवंते,अशोक मैड,अर्जुन टाक,श्री.चिंतामणी अनेकांनी हरिष माळवे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
