नाशिक दिनकर गायकवाड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केल्याची घटना घडली आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संध्या संजय भोई (वय ४८, रा. काठे गल्ली, द्वारका) या दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना यशोमंदिर सोसायटीच्या जवळ स्वेटर
घालण्यासाठी थांबल्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ मोटारसायकलीवरून आले. आले. पाठीमागे बसलेल्या इसमाने भोई यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून तेथून पळून गेले.या प्रकरणी भोई यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
