संगमनेर किशोर वाघमारे सहकार,शैक्षणिक आरोग्य बँकिंग इतर क्षेत्रात केलेलं काम आजही समाजाच्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडत असून सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला गोरगरीब हितकरी शेतकरी शेतमजूर यांचा आधारस्तंभ म्हणून खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटलांनी केलेलं काम आज दीपस्तंभ सारखी आहे असे मत प्रवरा माध्यमिक विद्यालय पिंप्री लौकी अजमपुर येथे ९ व्या पुर पुण्यस्मरण निमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलताना जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारत गिते यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे उपाध्यक्ष रामदास दातीर सेवानिवृत्त शिक्षक अशोक गिते सामाजिक कार्यकर्ते भीमराज गिते मुख्याध्यापक तायगा शिंदे सह शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलताना श्री.गिते म्हणाले की दिवंगत पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्य सर्व समाजाला दिशादर्शक होते त्यांनी सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारी सुरू करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले.
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मा.खासदार बाळासाहेब विखे यांची पुण्याई आहे त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी मतदारसंघ आज मॉडेल बनवला आहे.
मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी विकासात्मक काम करून खऱ्या अर्थाने न्याय दिला प्रवरा बॅंकेच्या माध्यमातून स्वयरोजगार निर्माण करून अनेक गरजूंना कर्ज वाटप करून खऱ्या अर्थाने उद्योगधंदे उभे करण्यामध्ये मदत केली आजही शिर्डी विधानसभा मतदारसंघ बरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील कित्येक युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
हे करत असताना राज्यात व देशात त्यांनी काम करताना संसदेमध्ये एक आगळावेगळा ठसा निर्माण केला देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे त्यांच्या कामामुळे आजही ते सर्वसामान्य माणसाच्या स्मरणात आहे खासदार बाळासाहेब विखे पा. हे चालतं बोलतोय व्यासपीठ होतं त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक कार्यकर्त्यांना भरारी देऊन उभे केले कित्येकांचे प्रपंच आज त्यांच्या दूरदृष्टीमुळे प्रगतीपथावर आहे.
राजकारणात सर्वसामान्य माणसाला आधार देणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून मला ज्यामध्ये खासदार बाळासाहेब विखे यांचे एक वेगळं नाव होतं त्यांची राहिलेले अधुरं स्वप्न त्यांचे सुपुत्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष सौ. शालिनी विखे मा. खासदार सुजय विखे पा.पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र जनतेच्या कामांमध्ये उभे असतात त्यांच्या या कामामुळे आज ते दीपस्तंभ सारखे जनतेबरोबर आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी अशोक गिते यांनी मनोगत व्यक्त केले
प्रास्ताविक मुख्याध्यापक तायगा शिंदे यांनी केले . आभार श्री पावडे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होत्या .
