पुणे प्रशांत निकम पुण्यातील हडपसर येथील स्पंदन ऑटिझम सेंटर आणि थेरपी सेंटर येथे जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ऑटिझमच्या विद्यार्थ्यांनी विविध गेम व कार्यक्रम सादर केले.
प्रसंगी स्पंदन ऑटिझम व थेरेपी सेंटरच्या अध्यक्षा माधुरी गाडेकर, उपाध्यक्ष पांडुरंग गाडेकर,ममता डुंगवाल,रुचिता जाधव,जया जाधव,उषा डिसुझा,शारदा दरंदले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.
या स्पंदन ऑटिझम अँड थेरपी सेंटर येथे स्पीच थेरपी,समुपदेशन,लेखन कौशल्य, बिहेवियर स्किल,आर्ट अँड क्राफ्ट आदी प्रकारचे शिक्षण दिले जाते. तसेच १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते.सध्याच्या धावपळीच्या व बदलत्या जीवनशैली मुळे अनेक ऑटिझम ग्रस्त मुले जन्माला येत आहेत.त्यामुळे याबाबत जनजागृती व्हावी तसेच पालकांनाही त्यांना सांभाळणे सुलभ व्हावे यासाठी स्पंदन ऑटिझम व थेरपी सेंटर तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त जनजागृती मोहीम घेण्यात आली आहे.
ऑटिझम एक अशी अवस्था असते की त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी थेरपीची मदत होते.अनेक मुले या आजारातून मुक्त झाली आहेत.तरी ज्या कुटुंबामध्ये व घरामध्ये ऑटिझमग्रस्त मुले असतील तर त्यांनी हडपसर येथील स्पंदन ऑटिझम व थेरपी सेंटर,वैभव टॉकीजच्या मागे,पी एम सी स्कूल ३२ नंबर जवळ येथे ७३ ५०० १२ ५७६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्पंदन ऑटिझम व थेरपी सेंटर संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
