किरणोपचार पदवी अभ्यासक्रमात प्रथम, उत्कृष्ट माजी विद्यार्थी’ पुरस्काराने गौरव
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर पंचायत समितीचे मा. विरोधी पक्षनेते व उंबरी बाळापुर गावचे ज्येष्ठ नेते सरुनाथ उंबरकर यांचे चिरंजीव समाधान उंबरकर यांनी किरणोपचार विषयातील पदवी किरणोपचार पदवी) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करत अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासह त्यांना ‘बेस्ट आऊटगोईंग अल्युमनाय अवॉर्ड’ (उत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार) देऊन गौरविण्यात आले असून, ही कामगिरी संगमनेर तालुक्यासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरली आहे.
हा मानाचा पुरस्कार सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे येथील संचालक डॉ.राजीव येरवाडेकर व डॉ. समिता जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कठोर परिश्रम, सातत्य आणि अभ्यासातील उत्कृष्टतेच्या बळावर समाधान उंबरकर यांनी हे यश संपादन केले आहे.
किरणोपचार रेडिओ थेरपी या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दाखवलेली प्रावीण्य भविष्यात अनेक रुग्णांच्या आयुष्यात आशा व दिलासा देणारी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, मा. खासदार डॉ.सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे, डॉ. राजेंद्र विखे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून तसेच संपूर्ण परिसरातून समाधान उंबरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
