स्वामीनारायण नगर येथील घरफोडीत रोकडसह सोन्याचे बिस्किट हडप

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरातील तीन लाखांच्या रोकडसह एक तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेल्याची घटना आडगाव नाका येथे घडली.
फिर्यादी हरजितसिंग हरभजनसिंग बनवेत (रा. स्वामीनारायणनगर, आडगाव नाका) यांची पत्नी गुरुदीप कौर या दुपारी ३ वाजता पंचवटीतील गुरुद्वारा येथे सिंग सभेसाठी व दर्शनासाठी गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने बनवेत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

घरातील बेडरूममध्ये लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकर तोडून तीन लाख रुपयांची रोकड व ५० हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे बिस्कीट असा एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!