संगमनेर हे बुद्धीवंताचे शहर म्हणून ओळखले जाते आणि जिथे प्रज्ञा येते तिथे मनुच्या पाकळ्या खिळखिळ्या होऊन निखळून पडतात,जसे अंतिम निवाडा करायला खुद्द वास्तव हेच अंतिम न्यायपीठ आहे अशी मानवशक्ती जागृतीचे व्रत घेतलेले संगमनेर महाविद्यालयाचे धर्म इतिहास आणि साहित्य यांचे अभ्यासक लेखक,वाचक आणि भविष्याच्या गर्भातील विचार मांडणारे .प्रा.डॉ.राहुल हांडे.
शिक्षक आपल्याला कोणत्याही स्वर्थाशिवाय यशाचा मार्ग दाखवतात चांगले वर्तन आणि नैतिकतेची व्यक्ती होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देतात शिक्षक आपल्या जीवनात खुप महत्वाचे आहेत शिक्षकांशिवाय जीवनात मानसिक,सामाजिक आणि बौद्धिक विकास होऊ शकत नाही.साहित्यात कुठलेही मोठेपणा मिरविण्याची तृष्णा नसलेला एक अतिसामान्य माणूस हि त्यांच्यातली जाणीव मला त्यांच्या लिखाणातून,चर्चेतुन जाणवतेय.त्यांनी मराठी साहित्यातील लाभाच्या स्वप्नभुमीला नाकारत आणि तत्वचुत करुन अनेक विषयांना मानवी नितीमुल्ये आणि उत्कृष्ठ पारमिता जीवन प्रणालीचा बाज देऊन स्पर्श केला आणि मानवशक्तीचे जागरण करत आहे.त्यांच्या लिखाणाचा प्रारंभबिंदु नक्कीच वाचकांना अंतर्मुख करत जाईल तोच त्यांच्या समाधानाचा अत्युच्च बिंदू ठरेल.
जसे बंडखोर साहित्याने अभिजन साहित्याला आव्हान दिले तशीच त्यांची मानवतावादी विचार प्रणाली सर्वव्यापी बनत जाईल आणि त्यांच्या ज्ञानमयी साहित्याची,लिखाणाची मराठी साहित्याला दखल घ्यावीच लागणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेषा मला त्यांच्या लिखाणातील सर्वच पात्र जजिष्णु वाटतात भविष्यात त्यांच्या हातुन अनेक विषय हाताळले जावोत.ते म्हणतात मी स्वतःला एक अतिसामान्य माणूस समजत असतो आणि याची जाणीव त्यांच्यात कायम दिसते असे करत इथपर्यंतचे मार्गक्रमण त्यांनी केलेले आहे.एकमात्र खरे की ते नेहमी परखड राहिले आहेत.
माणूस वर्तमानात पुन्हा-पुन्हा त्याच त्याच चूका करत धडपडत घडत असतो ते रुढार्थाने कोणतेही वादी नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या प्रत्येक महापुरुषांशी आणि लोकांसाठी.. लोकक्रांतीसाठी..सतत संघर्ष करणाऱ्या विचारधारेशी त्यांचे जन्मजात सेंद्रिय नाते आहे.ते शिव फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे,गांधीवादी आहे,मार्क्सवादी आहे,समाजवादी आहे,सुधारणावादी भक्ती आंदोलनांचा चाहते आहे अगदी सर्वव्यापी मानवशक्ती जागृतीचे व्रत त्यांनी घेतलेले आहे पण मात्र कोणत्याही एका खुंट्याला स्वतःला त्यांनी बांधून घेतलेले नाही.
कोणत्याही एकाच विचारधारेची झुल पांघरणे त्यांच्या स्वभावात बिलकुल नाही.सर्व पुरोगामी विचारधारा ह्या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी कार्यरत असतात.याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.माणसाने एकाच विचारधारेला कवाटाळले की तो सनातनी होतो.असा इशारा देण्यास सुद्धा ते बिचकत नाही, पुरोगामी विचारधारांचा हा परस्परविरोधी सनातनपणाच आज प्रतिगामी सनातन शक्तींना पूरक ठरत आहे.असे त्यांचे वैयक्तिक मत आहे.
डॉ.राहूल हांडे यांनी कोणत्याही एका विचारधारेचा झेंडा हाती न घेतल्यामुळे मानवतेसाठी चाललेल्या कोणत्याही लढयाचा झेंडा हाती घेण्यास ते स्वतंत्र आहे.त्यामुळे कोणत्याही विचारधारेचं भय त्यांना वाटत नाही.एवढंच काय लेखन क्षेत्रात आणि प्राध्यापकी मध्ये देखील ते कोणत्याही गटाचे सद्स्य नाही,राहिला प्रश्न व्यवस्थेचा त्याचेही भय त्यांना बिलकुल वाटत नाही.त्यामागे एक महत्वाचे कारण आहे.
जीवनात अनेक ठेचा खाल्यानंतर त्यांना तथागत भगवान बुद्धापासून ते तुकोबांपर्यंत सर्व बहुजन महात्मे त्यांना मार्ग दाखवू शकतात याची जाणीव होत गेली.व्यवस्थेत वा दैनंदिन जीवनात त्यांनी बुद्धांप्रमाणे स्वतःचे म्हणून एक 'पंचशील' तत्त्वं अमंलात आणले आहे.आणि जे प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करत जाते त्याला ते पाच 'प' चे पंचशील म्हणतात.ते पाच 'प'खालील प्रमाणे क्रमवार बघता येईल.
१) पद - मला कोणतेही पद नकोय
२) पुरस्कार - मला कोणताही पुरस्कार नकोय
३) प्रसिद्धी - मला कोणतीही प्रसिद्धी नकोय
४) प्रतिष्ठा - मला कोणी प्रतिष्ठा द्यावी,असं मला चूकूनही वाटत नाही
५) पगार - पगाराव्यतिरिक्त मला कोणताही पैसा नकोय
हे आहेत त्यांचा जीवनप्रणालीचे पाच 'प' चे पंचशील.ह्या गोष्टींचा त्याग केल्यामुळे काही कमावण्याची कामनाच राहिली नाही तर गमावण्याची भीती काय राहणार.ह्या पाच गोष्टींसाठी धडपडणाऱ्याबद्दल त्यांच्या मनात आकस देखील नाही.प्रत्येकाची वेगवेगळी जीवन जगण्याची ती शैली असते.
एव्हढेच की त्यांना ध्येयापर्यंत पोहचण्याइतके, चालण्याचे श्रेय देखील महत्वाचे वाटते.जीवनाच्या रस्त्याचा आनंद त्यांना धावधाव करून गमवायचा नाही.हे त्यांचे वैयक्तिक मत इतरांना देखील प्रेरणादायी ठरते. ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सर्वात शेवटी बसतात,त्यामुळे त्यांना संपूर्ण रसिक होता येते,साध्याच्या भाषेत अंगावरच्या लंगोटीसह वस्त्र काढून राख फासलेल्या माणसाचे कोण काय हिसकावून घेऊ शकणार.असे असले तरी मधून-मधून भाले टोचण्याचा प्रयत्न होतच असतो.
ते केवळ सहन करायचे नाही,तर त्यांच्या प्रतिकाराचा आनंद घ्यायचा. याच्यातून अखेरच्या श्वासाला एकच समाधान पदरी पडणार आहे.ते म्हणजे मिळालेले सुंदर जीवन सन्मानानं जगल्याचे समाधान.पाप-पुण्य ह्या थोतांडाशी याचा काही एक संबंध नसतो.आज त्यांचा वाढदिवस आजच्या मंगलदिनी त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा त्या निमित्ताने..
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्ने साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..महापुरुषांच्या विचाराने आपल्या जाणिवा प्रगल्भ होत जात आपल्याला उदंड आयुष्य लाभो..
शिवरायांच्या विचाराने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी तुरे..
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
Wish You Happy Birthday Sir
महेश भोसले -संगमनेर
manavmudrasvs2021@gmail.com
