बाल लैंगिक गुन्ह्यांसाठीची माहिती माध्यमात प्रसारीत करताना पिडीत बालकांची गोपनीयता महत्त्वाची

Cityline Media
0
नाशिक ग्रामीण पोलिसांचे आवाहन;अन्यथा कारावास 

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक ग्रामीण पोलीस दलाद्वारे सर्व जनतेस कळविण्यात आले आहे की, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम सन २०१२ कलम २३ नुसार गुन्हयातील पिडीत बालकांची ओळख उघड करणारे फोटो,व्हिडीओ, नाव, पत्ता,शाळा किंवा कुठलीही वैयक्तीक माहिती हे प्रिंट माध्यम,इलेक्ट्रॉनिक न्युज,सोशल मिडीया किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रसारीत करणे किंवा शेअर करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
कोणतीही न्युज चॅनल,वृत्तपत्र व्हॉटसॲप, इंस्टाग्राम, फेसबुक,एक्स ‌ट्विटर,युट्युब इत्यादीवर पिडीत बालकांचा चेहरा किंवा ओळख दिसेल अशा स्वरुपात माहिती प्रसारीत केल्यास आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नाशिक ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध पत्रकान्वये सांगितले.

या कायदयानुसार पिडीत बालकाची ओळख उघड करणारी माहिती जाणून बुजुन किंवा निष्काळजीपणे प्रसारीत करणा-यास ०६ महिने ते ०१ वर्षापर्यंत कारावास आणि दंड अशी शिक्षा होवु शकते.

न्यायालयाच्या स्पष्ट परवानगी शिवाय अशा प्रकरचा मजकुर प्रकाशीत / प्रसारीत करणे बेकायदेशीर आहे.

अशा पोस्ट / फोटो / व्हिडीओ शेअर किंवा फॉरवर्ड करणारे खातेधारक, पेज ॲडमीन, ग्रुप ॲडमीन यांना देखील जबाबदार धरले जाऊ शकते.

यामुळे सर्व पत्रकार,डिजीटल कंटेट पब्लीशर्स, सोशल मिडीया युजर्स आणि ग्रुप ॲडमीन यांना सुचीत करण्यात येते की,बाल लैंगिक गुन्हयांसबंधी बातम्या किंवा माहिती प्रसारीत करताना पिडीत बालकांची गोपनीयता आणि ओळख संरक्षीत ठेवणे अनिवार्य आहे.

बालकांची सुरक्षितता, सन्मान आणि गोपनीयता राखणे हे आपले सामुहीक कर्तव्य आहे असे नाशिक ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध पत्रकान्वये सांगितले आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!