दाढ खुर्द प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथील शेतकरी विकास मंडळाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा प्रगतशिल शेतकरी सुरेश बाबुराव दातीर (वय ६० ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी असा परिवार असून ते दाढ खुर्द येथील ह.भ.प.अशोक महाराज जोशी यांचे ते साडू होते तर युवक काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी यांचे ते काका होत त्यांच्या निधनाने दाढ खुर्द परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
