महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लावण्यवतीचा मुंबईत सन्मान

Cityline Media
0
संगमनेरच्या आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर,विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतींचा जागर

संगमनेर नितीनचंद्र भालेराव महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवणाऱ्या आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा सन्मान मुंबईत होणार आहे.अद्वैत थिएटर्स आणि काली बिल्ली प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन  पु.ल.देशपांडे मिनी ऑडिटोरियम,रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी दु. ४ ते सायं. ७ आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या तमाशा कलाक्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला महाराष्ट्राच्या लावणीला मोठे वलय व उंची मिळवू दिली अशा आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर,महाराष्ट्राचे लोककला संस्कृती आपल्या कलेच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर पोहोचविणाऱ्या राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतींचा जागर या महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार २०२५ सोहळ्याच्या माध्यमातून होणार आहे. तसेच लावण्य सम्राज्ञी व अभ्यासक रेश्मा मुसळे - परितेकर यांच्या सह आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा,स्मृतीचा वारसा चालविणारे कुटुंबीयांचा पारितोषिक देवून सन्मान करण्यात येणार आहे.

महिला आयोगाच्या मा.सदस्या ॲड.आशा लांडगे मा.सदस्य,तसेच न्यूज २४×७  मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पनाड यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय लेखिका प्रा.शैलजा पाईक द वल्गरिटी ऑफ कास्ट: दलित, लैंगिकता आणि मानवता आधुनिक भारतातील’ (२०२२) या अभ्यासग्रंथात त्यांनी महाराष्ट्रातील जात, वर्ग, लिंग, लैंगिकता आणि लोकप्रिय संस्कृतीतील राजकारणाचे सम्यक विश्लेषण केले आहे.

या ग्रंथातून आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर,राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई
नारायणगावकर,तसेच कांताबाई सातारकर व सुरेखा पुणेकर अशा महान महिला कलावंतांच्या ऐतिहासिक योगदानाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे आणि त्यानंतर कला क्षेत्रातील महान विभूतींचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले.त्यांना मॅकआर्थर फाउंडेशनची २०२४ ची “जीनियस” फेलोशिप मिळाल्याने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे विचार अधिक ठळक झाले आहेत.

तोच धागा पकडून अद्वैत थिएटर्स आणि काली बिल्ली प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार माध्यमातून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीत इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या महान कलावंतांचा त्यांच्या स्मृतीचा जागर होणार आहे तसेच त्यांच्या वारसांचा सन्मान करण्याचे कौतुकास्पद उपक्रमाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रवीण मोरे हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.सामाजिक जनजागृती समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  प्रवीण मोरे यांचा नेहमीच पुढाकार असतो अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी दिली.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!