नोकरीचे आमिष फोन पे च्या माध्यमातून पन्नास हजार लुबाडत तरुणीची फसवणूक

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणीची ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नवीन नाशिक मध्ये घडली असून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
रक्षा विजय मोरे (वय २४, रा.रायगड चौक,सावतानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला.फोन करणाऱ्या व्यक्तीने 'मी तुझा मित्र दौलत बोलतोय' असे सांगत बँक ऑफ महाराष्ट्र येथे रिक्त पदे असल्याचे सांगितले.त्यासाठी त्याच्या ओळखीच्या एका अधिकाऱ्याद्वारे नोकरी मिळवून देऊ शकतो,परंतु चार लाख रुपये लागतील,त्यापैकी दोन लाख तातडीने जमा करावे लागतील असे सांगितले.


त्यावेळी फिर्यादीच्या भावाने दीपक यांनी आरोपीने दिलेल्या क्रमांकावर ( फोन पे च्या माध्यमातून ५० हजार रुपये पाठविले.त्यानंतर रक्षा मोरे यांनी प्रत्यक्ष आपल्या मित्र दौलत महाले यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांनी असा कोणताही फोन न केल्याचे आणि पैसे न घेतल्याचे सांगितले. यावरून फसवणूक झाल्याचे - त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला - असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार पुढील तपास करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!