१२ डिसेंबर पर्यंत नामकरण न झाल्यास माळी महासंघातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे प्रशांत निकम येथील माळी महासंघ पुणे शहर तर्फे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन नामकरणासाठी पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दिपक जगताप यांच्या तर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. गेल्या चार वर्षापासून प्रशासनाला माळी महासंघ पुणे शहरच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु मेट्रो स्टेशन प्रशासनाने मंडई मेट्रो स्टेशन असेच नाव ठेवले असून ते महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे त्वरित करावे अशी मागणी माळी महासंघ पुणे शहर तर्फे करण्यात आली होती.
या उपोषणाची दखल चौथ्या दिवशी मेट्रो प्रशासनाने घेऊन , मेट्रो प्रशासनाच्या प्रशासन जनसंपर्क व रोलिंग स्टाफचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी लेखी निवेदन दिले. या मध्ये वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदिप कसबे यांनी मोलाचे सहकार्य केले .
या मध्ये मेट्रो प्रशासनाकडून मंडई मेट्रो स्टेशनचे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे नामकरण १२ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.त्यानंतर पुण्याच्या मा.आमदार कमल ढोले व पुणे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या हस्ते दिपक जगताप यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काळुराम आण्णा गायकवाड ,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष गायत्री लडकत,महिला अध्यक्षा स्मिता शैलेश लडकत ,ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष नानासाहेब कुदळे , हिरामण भुजबळ प्रदेश उपाध्यक्ष ,युवा कार्याध्यक्ष प्रज्वल बनकर ,उपाध्यक्ष बाळासाहेब लडकत
सचिव गिरीश झगडे , सचिव रिमा लडकत, महात्मा फुले वसतीगृह विश्वस्त राहुल ढोले सुनंदा बोराटे सन्मित्र बँक अध्यक्ष गणेश फुलारे ,सारंग राऊत,यशोधन आखाडे, संदिप कुदळे,सिमा घोड,शारदा फरांदे,राजेंद्र लडकत,रवी सहाणे, सोमनाथ बटवाल,हनुमंत टिळेकर,योगेश वाघोले,
कुंडलिक गायकवाड,गणेश वाडकर, गणेश रोडे मारुती भुजबळ,राजेंद्र मानकर,नितिन कळमकर, स्मिता सुधीर लडकत हरिष जाधव सतिष गायकवाड विलास रासकर इंद्रजित रायकर प्रतिभा झगडे भिमराव जैवाळ वंदना बनकर,वनिता नांगरे,शशिकला ढोले पाटिल,वैशाली रासकर,
विजय कोठावळे,संदिप चौरे, योगेश टिळेकर संतोष बनकरअनंता रासकर,कैलास काटे, तेजा भास्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मंडई मेट्रो स्टेशनचे नामकरण महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे १२ डिसेंबर २०२५ पर्यंत न झाल्यात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माळी महासंघ पुणे शहर शाखेचे अध्यक्ष दीपक जगताप यांनी दिला आहे.या बेमुदत उपोषण आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला.
