वैवाहिक आयुष्य उज्वल होण्यासाठी तडजोड महत्वाची-अनिल धिवर

Cityline Media
0
राहाता प्रतिनिधी विवाहयोग्य मुला-मुलींचा वैवाहिक जीवनप्रवास सुखकर व उज्वल होण्यासाठी लग्न जुळवताना तडजोड करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ईशकृपा प्रकाशनचे प्रकाशक अनिल धिवर यांनी नुकतेच केले.
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बाळ येशू चर्च मध्ये स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या १६७ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याच्या उदघाट्न प्रसंगी अनिल धिवर बोलत होते.नाशिक मधील नियोजित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून या सामाजिक उपक्रमाचे उदघाट्न लेखक अनिल धिवर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रेव्ह. फादर मायकल वाघमारे,फादर राजेंद्र लोंढे,फादर प्रकाश राऊत, शशी कदम,आशिष बनसोडे, गोपीनाथ चक्रनारायण आदींनी उपस्थिताना अमोघ मार्गदर्शन केले. 

संभाजीनगर,अहिल्यानगर, श्रीरामपूर,नाशिक, कल्याण आदी ठिकाणाहून आलेल्यांची उपस्थिती ८५ हुन अधिक होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याकोब लोंढे, बाळासाहेब ब्राम्हणे, सुभाष कदम,राजेश्वर पारखे मायकल जाधव आदिनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!