जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड हस्तलेखन स्पर्धेत अभूतपूर्व यश

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड हस्तलेखन स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या स्पर्धेत एकूण १२४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला.
स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले आणि त्यांना ए+ ग्रेड देऊन गौरवण्यात आले. तर अधिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली व त्यांना ए++ ग्रेड देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका वाय. बी. गायधनी यांचे मार्गदर्शन तसेच के. एम. चव्हाण आणि होळकर यांच्यासह इतर सर्व शिक्षिकांचे अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.

या उपलब्धी निमित्त मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, जनता विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक प्रसाद भालेकर,बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक के.के.तांदळे आणि शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. मुख्याध्यापिका वाय. बी. गायधनी यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले, की सर्व शिक्षकांनी एकजुटीने केलेल्या कार्याचे हे यश आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा देऊन त्यांच्या हस्तलेखन कौशल्याचा विकास करण्यात सर्वांचा सहभाग राहिला आहे.यापुढेही अशाच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!