मंदिराची जमीन परत देण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंदिर बाबा श्री पीर रतन नाथ जी, पुणे सेवादार मंडळ" तर्फे निवेदन
पुणे प्रशांत निकम दिल्ली येथे नुकतेच मंदिर बाबा श्री पीर रतन नाथ जी, झंडेवालान नवी दिल्ली, येथे मंदिराची तोड फोड करण्यात आली ज्या मध्ये मंदिराचे तुळशी वन, लंगर घर आदींचे चे बुलडोझर ने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंदिर बाबा श्री पीर रतन नाथ जी, पुणे सेवादार मंडळ" तर्फे कोंढवा येथील महादेव मंदिर येथे निषेध सभेचे आयोजन केले होते.
यावेळी पंजाबी समाजाचे अमित अरोरा,निशा अरोरा, कोमल खन्ना, अनिता तलवार,प्रवीण आहूजा,सुमित खन्ना, निशा खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
पंजाबी समाजाचे श्रद्धास्थान गोरक्षनाथांचे शिष्य पीर रतननाथ आहेत. या पीर रतन नाथांचे ८० वर्षापासून असलेले दिल्ली येथील मंदिरचा मोठा भाग दिल्ली सरकारकडून बुलडोझरने पाडण्यात आला.
त्यामुळे पुण्यातील पंजाबी समाजाचे अनुयायी संतप्त झाले आहेत. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर हा समाज पुणे, बारामती, कोल्हापूर, नाशिक,अहिल्यानगर, श्रीरामपूर,कोपरगाव, राहुरी येथे वास्तव्यास आहे.
यावेळी मंदिरा समोर हरेनामचा जप करण्यात आला.
या निषेध सभेमध्ये दिल्ली येथील पंजाबी समाजाचे आस्था स्थान असलेलले मंदिर श्री पीर रतनाथ यांचे आहे. पंजाबी समाजाचे श्रद्धास्थान गोरक्षनाथांचे शिष्य पीर रतननाथ आहेत.या पीर रतन नाथांचे ८० वर्षापासून असलेले दिल्ली येथील मंदिर याचा इतिहास १४०० वर्षापासूनच आहे ते मंदिर दिल्ली सरकारकडून बुलडोझरने पाडण्यात आले.
या मंदिरासाठी दिल्ली निगम बोर्डाकडून जागा देण्यात आली होती.या घटने संदर्भात पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी दिल्ली संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
या निवेदनामध्ये रतननाथ मंदिर ची वीज, पाणी,गॅस त्वरित सुरू करावे, लंगर घर व तुळशीवन पुन्हा तयार करण्यात यावे,मंदिराच्या जमिनीवर लावण्यात आलेले निळे पत्रे त्वरित काढण्यात यावे, महिलांवर लाठी चार करणाऱ्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,
मुन्सिपल कॉर्पोरेशन दिल्ली व दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी(एमसीडी -डीडीए) यांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, मंदिराला स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
या रतननाथ मंदिराचा उल्लेख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणामध्येही करण्यात आला आहे.तरी शासनाने गंभीरपणे या घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाई करून मंदिराची लंगर घर, तुळशी वन व बाकी परिसराची जागा त्वरित पीर रतननाथ यांच्या मंदिर प्रशासनाला देण्यात यावी अशी मागणी पुण्यातील लाखो भक्तजणांनी केली आहे.जर ही जागा लवकरात लवकर दिली नाही तर या अनुयायातर्फे नियमित हर श्रीराम चा जप करून शांततेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा "मंदिर बाबा श्री पीर रतन नाथ जी पुणे सेवादार मंडळ संघटनेचे प्रवीण आहुजा यांनी दिला आहे.
