आम्ही पोलिस आहोत अशी बातावणी करुन तोतयाने लुटले वृद्धाचे सोन्याचे लॉकेट

Cityline Media
0
 नाशिक दिनकर गायकवाड आम्ही पोलीस आहोत, तिकडे ड्रग्जची तपासणी चालू आहे.तुमच्या गळ्यातील व खिशातील वस्तू काढून रुमालात ठेवा, असे सांगून तोतया पोलिसांनी मुंबईच्या वृद्धाचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट लांबविल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी रवींद्र तुकाराम गव्हाणकर (रा. रामदूत चाळ, करी रोड, मुंबई) हे नुकतेच सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शारदा शाळेच्या समोरील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक मोटारसायकलीवरून दोन अनोळखी इसम आले.

त्यातील एक जण फिर्यादीजवळ येऊन त्यांना म्हणाला, की आम्ही पोलीस आहोत. तेथे चेकिंग सुरू आहे. तुमच्या गळ्यातील व खिशातील वस्तू काढन रुमालात ठेवा. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट काढत असताना तोतया पोलिसांनी फिर्यादीच्या हातातील लॉकेट हातचलाखीने चोरी करून फसवणूक केली व ते दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!