कुमावत बेलदार समाजाच्या अध्यक्ष पदी महेश छल्लारे यांची एकमताने निवड

Cityline Media
0

-अंजली परदेशी यांची महिला जिल्हाध्यक्षापदी अंजली परदेशी तर शहराध्यक्षपदी प्रवीण परदेशी  निवड

झरेकाठी सोमनाथ डोळे नुकतीच अहिल्यानगर येथे कुमावत (बेलदार) समाजसेवा महाराष्ट्र राज्य संघ यांच्या वतीने कुमावत बेलदार समाज सेवा संघाची महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.
                जिल्हाध्यक्ष इंजि महेश छल्लारे 
या कार्यक्रमात कुमावत बेलदार समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश छल्लारे तर शहराध्यक्षपदी मर्चंट बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण रामकृष्ण परदेशी व महिला जिल्हाध्यक्षपदी अंजली प्रवीण परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांनी जमलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करून आपल्या समाजासाठी आपण काय केले पाहिजे.आपला समाज कुठल्याही बाबतीत मागासलेला न राहता सर्व क्षेत्रात समाजाने मानाचे स्थान मिळविले पाहिजे यासाठी आपण समाज कार्यासाठी झटुन काम केले पाहिजे. व कुमावत बेलदार समाजाचे केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार पर्यंत कुमावत बेलदार समाजाची जात निहाय मान्यता मिळाली असल्याने समाजाने याचा फायदा करून घेण्याचे आवाहन यावेळी श्रीकांत परदेशी यांनी समाज बांधवांना केले.
       महिला जिल्हाध्यक्ष अंजली प्रविण परदेशी 
या बैठकीत जिल्हा व शहर पातळीवरील विविध पदांसाठी पुढीलप्रमाणे निवडी  करण्यात आल्या असून त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष संजय कुक्कडवाल, तालुका सचिवपदी इंजिनिअर पुरुषोत्तम अरुण छल्लारे 
 युवा जिल्हाध्यक्ष शुभम राजवाळ, शहर युवा संघटना अध्यक्ष  सागर कुक्कडवाल, महिलाआघाडी शहराध्यक्ष  जया अनावडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष,आरती कुक्कडवाल, आदींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

या मेळाव्यासाठी व्यासपीठावर समाज भूषण कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी, राज्याध्यक्ष भगवान दादा कुमावत, शिवसेना नेत्या सविता कुमावत, निलेश कुमावत, तसेच निवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रल्हाद सारडीवाल, दीपक परदेशी, गणेश छल्लारे पत्रकार राजेंद्र परदेशी, सुनील कुमावत सिद्धांत परदेशी, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या बैठकीत समाजातील एकजूट, संघटन विस्तार, युवक व महिला सहभाग वाढ, तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. नव्या कार्यकारिणीमुळे समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अधिक प्रभावी, रचनात्मक आणि सर्वसमावेशक कार्य समाज बांधवांकडून निश्चितच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी अरुण छल्लारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर अनावडे यांनी मानले.           तालुकाध्यक्ष-प्रविण रामकृष्ण परदेशी 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!