श्री क्षेत्र बाजाठाण येथील अत्याधुनिक गो शाळेचे महंत हरिचरणगिरी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन

Cityline Media
0
झरेकाठी प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बाजाठाण येथे राम दरबार आश्रम या ठिकाणी ३२ लक्ष रूपये खर्च करून अत्याधुनिक गो शाळेचे भूमिपूजन संस्थांचे मंहत गुरुवर्य श्री हरिचरण गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री गुरुवर्य दादा महाराज वायसळ गुरुवर्य बाळकृष्ण महाराज दिघे हनुमान भक्त ज्योतिष तज्ञ बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते श्री किरण गुरु यांच्या मंत्र उपचाराने गोमातेची पूजन करून कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ हार घालून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या भूमिपूजनानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये गुरुवर्य श्री दादा महाराज वायसळ यांच्या पवित्र वाणीतून गीता जयंती निमित्त राम दरबार येथे कीर्तन सेवा पार पडली त्यानंतर संस्थांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे स्नेहभोजन देण्यात आल या कार्यक्रमास संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!