नाशिक दिनकर गायकवाड शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी व साक्षीदार यांना विविध व्हॉट्सॲप क्रमांक,टेलिग्राम यांवरून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला.व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासविले. त्यानुसार ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष
दाखविले, तसेच फिर्यादी व साक्षीदार यांनी फसवणूक करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ८० लाख १० हजार ६५० रुपये मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास लावून त्यांना त्यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.हा प्रकार दि. २७ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.
