नाशिक दिनकर गायकवाड नाशिक द्वारका परिसरात वाहनातून आलेला सुमारे ७२ लाख २० हजार रुपये किमतीचा अवैध गुटख्याचा साठा नुकताच वाहनासह जप्त करण्यात आला असून येथील कन्नमवार पुलावर ट्रकवर हा छापा टाकत पोलिसांनी केली कारवाई.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी सुरेश रामचंद्र बैरागी (रा. गोपाळ कॉलनी, झाबुआ, मध्य प्रदेश) हा वाहनचालक असून, तो एमएमएच १८ बीए ९८८८ या क्रमांकाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या वाहनामध्ये लक्झरी च्युइंग टोबॅको
एका मोठ्या गोणीमध्ये २० लाख ७३ हजार ६०० रुपये किंमतीचे १६ छोटे बॉक्स, त्यामध्ये प्रत्येकी ४५ पाकिटे अशा एकूण १६ गोण्या मिळून ११ हजार ५२० पाकिटे, ४१ लाख
४७ हजार २०० रुपये किमतीच्या स्पेशल पानमसाला या सुगंधित तंबाखूच्या एका मोठ्या गोणीमध्ये चार पिशव्या, प्रत्येक पिशवीत ४५ पाकिटे, अशा एकूण ६४ गोण्या मिळून ११ हजार ५२० बॉक्स असा एकूण ६२ लाख २० हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार या पथकाने हा ट्रक द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊसजवळील सर्व्हिस रोड येथे आला असता पथकाने या ट्रकवर छापा टाकला.या कारवाईत अवैध गुटख्यासह ट्रक असा एकूण ७२ लाख २० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार ट्रकचालक बैरागी, गुटखा उत्पादक कंपनी, अज्ञात वाहनमालक, वितरक राजेश शेट्टीयार व वाहतूकदार आशू गुप्ता व मध्य प्रदेशातील अज्ञात पुरवठादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
