महापालिका पंचवार्षिक निवडणूक आज अंतिम दिवस
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी देखील १२४८ अर्जाची विक्री झाली. तर तीन दिवसात आतापर्यंत एकूण ४८५३ अर्जाची विक्री झाली आहे.
नाताळच्या सुटीनंतर मनपाच्या निवडणुकीसाठी ५९० इच्छुकांनी ११४८ उमेदवारी अर्ज घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता तीनच दिवस उरले असून आज ३० डिसेंबरला अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी सहा विभागांमध्ये इच्छुकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशी १७६३, दुसऱ्या दिवशी १९४२ व आता ११४८ अशी तीन दिवसात ४८५३ अर्जाची विक्रमी विक्री झाली आहे.अर्ज विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असली तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुकांनी अद्याप सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.तरीही गत तीन दिवसात सुमारे वीस इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समजते.अंतिम तारखेच्या जवळ येताच अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व विभागीय कार्यालयात उमेदवारांची व त्यांच्या असमर्थकांची गर्दी आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत.
दाखल केलेले अर्ज - सिडको विभागातील प्रभाग क्रमांक
२९ (ब) मधून योगिता अपूर्व हिरे व यमुना बाळासाहेब घुगे या दोन महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सातपूरला प्रभाग क्रमांक ८ मधून अशोक जाधव, प्रभाग क्रमांक १० मधून रवींद्र देवरे, तर प्रभाग क्रमांक ११ मधून गीता जाधव आणि समाधान अहिरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग दाखल झालेले अर्ज २ सी १, ४ डी १, ८ सी १, १० डी १, ११ ए १, १२ डी १, डी १,१४ ए २,१४ डी १, १७ सी २, २१ ए४, २१ सी १, १३ २९ बी २,३० डी १ याप्रमाणे एकोणवीस उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत.
काल विक्री झालेले अर्ज-पंचवटी विभाग : १७२ पश्चिम विभाग: १३९ पूर्व विभाग: २५५
नाशिकरोड: २८९ सिडको : १५६
सातपूर : १३७ एकूण : ११४८
नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सर्वाधिक अर्ज विक्री प्रभाग १७मधून ६२ त्या खालोखाल प्रभाग १४ मधून ५९ आणि प्रभाग २४ मधून ५४ तर सर्वात कमी अर्ज विक्री प्रभाग ५ मधून १४, प्रभाग ६ मधून १५ तर प्रभाग २९ मधून १६ याप्रमाणे उमेदवारी अर्जाची विक्री झाली.
