५ वर्षे लैंगिक संबंधानंतर गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड महिलेचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या इसमासह त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ही सिडको परिसरात रहाते.आरोपी विनोद कुचेडिया (वय ५५) याने सिडकोतील त्रिमूर्ती चौकात फिर्यादीच्या दुकानात जाऊन तिच्याशी ओळख निर्माण करुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष
दाखवून लेखानगर येथील ग्रॅण्ड अश्विन हॉटेल, इंदिरानगर येथील साई साया हॉटेल, साईकिरण हॉटेल, पाथर्डी फाटा येथील हॉटेल सेवन हेवन, तसेच फिर्यादीच्या दुकानात नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यासंबंधाचे व्हिडिओही काढले. ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पिडीतेसोबत लैंगिक अत्याचार केले.
फिर्यादी महिलेने आरोपी विनोद कुचेरीया याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेची फसवणूक कुचेरीया यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण विनोद कुचेरीयाची ३५ केली. फिर्यादी महिला व आरोपी
वर्षीय मुलीला लागली. त्यानंतर आरोपीच्या मुलीने पिडीत महिलेला शिवीगाळ केली. तसेच आरोपीच्या सत्तरवर्षीय आईने पिडीतेला फोन वरून धमकी देत 'विनोद पैसे वाला आहे, तु दुसरे लग्न करून टाक नाही तर तुला खूप महागात पडेल,' अशी धमकी दिली.
हा प्रकार १४ ऑगस्ट २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विनोद कुचेरीया, त्याची मुलगी व त्याची आई या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पलांडे करीत आहेत.
