नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात यंदा तब्बल १३९० इच्छुक आपले नशीब अजमावणार आहेत. नुकतेच तब्बल ६६६ इच्छुकांची माघार झाली. माघारीच्या शेवटच्या दिवशी सिंडको, पंचवटी व पूर्व विभागात माघारीवरुन मोठ्या नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.
प्रभाग २९ मधील उमेदवारी वरून मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट होऊनही बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल. तर माजी नगरसेवक देवानंद बिरारी व त्यांची पत्नी यांचा प्रभाग ३१ मधील भाजप उमेदवार बालम शिरसाठ यांच्यामध्ये शिवीगाळ होऊन प्रकरण हाणामारीपर्यत गेले.
पंचवटीत भाजपाचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड या उमेदवारास त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी घरात कोंडून घेतले.याशिवाय माजी नगरसेविका रुचि कुंभारकर यांना काही मिनिटे उशीर झाल्याने त्यांची माघार होऊ शकली नाही.नाशिक
अखेरच्या दिवशी एकूण ६६६ इच्छुकांनी घेतली माघार
या प्रकरणी देवानंद बिरारी यांच्या पत्नी वंदना बिरारी यांनी अंबड पोलीस ठाण्यात बाळकृष्ण शिरसाठ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेमुळे सिडकोतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली जात असून असेच वातावरण राहिल्यास मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पूर्व विभागात नंदू कहार यांनी स्थानिक आमदारावर गंभीर आरोप केले. दरम्यान एबी फॉर्मच्या गोंधळावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. सुधाकर बडगुजर यांच्या घरात तीन उमेदवारी वरून आ. सीमा हिरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टाळत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली.त्यामुळे महाजन यांना हिरे यांनी का टाळले, याचीच भाजपमध्ये चर्चा होती. काल सुधाकर बडगुजर यांनी त्यांची पत्नी हर्षा बडगुजर व पुत्र दीपक यांचा प्रभाग २५ मधील उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु प्रभाग २९ मधील उमेदवारी कायम ठेवत माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बाद
केले.परिणामी शहाणे यांच्यावर अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ ओढावल्याचे चित्र आहे. शहरातील दहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये छाननी प्रक्रिया राबवल्यानंतर माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात १३९० उमेदवार असून शहरातील ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी सुमारे १३ लाख ५० हजार मतदार नाशिक महानगर पालिकेत नवे कारभारी पाठवणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली. ३० डिसेंबरपर्यत अर्ज स्विकारले गेले. सात दिवसांत तब्बल
पक्षनिहाय अंतिम उमेदवारी अशी भाजप
११८ शिंदेसेना -९० ठाकरे सेना -८० मनसे -२९ शरद पवार गट -२९ राष्ट्रवादी अजित पवार गट- ३० तेवीसशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर छाननीत २७७ अर्ज बाद केले गेले.
दरम्यान अर्ज माघारीच्या दोन दिवसांत नाट्यमय घडामोडी घडल्याचे दिसून आले.नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीच्या काल अखेरच्या दिवशी सिडको विभागीय कार्यालय परिसरात माघारीवरून मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अपक्ष उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारामधील वादाचे रूपांतर थेट हाणामारीत
झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले. प्रभाग क्रमांक ३१ मधून भाजपकडून इच्छुक असलेले देवानंद बिरारी यांना पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रभागातून बाळकृष्ण शिरसाठ यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने बिरारी यांच्यात नाराजी होती.
एबी फॉर्म न मिळाल्याच्या मुद्यावरून दोघांमध्ये आधीपासूनच तणाव असल्याची चर्चा होती. अर्ज माघारीच्या दिवशी सिडको विभागीय कार्यालय परिसरात दोघे समोरासमोर आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला जाऊन शिवीगाळ व हाणामारीत रूपांतरित झाला. अचानक व घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
