पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्यांनी शहरातून सहा मोटरसायकली केल्या लंपास

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून,वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा मोटारसायकली अज्ञात ठिकाणांहून चोरून नेल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
वाहनचोरीचा पहिला प्रकार दिल्ली दरवाजा येथे घडला. फिर्यादी प्रमोद उत्तम जगताप (रा. प्लॉट नंबर २, मारुती संकुल, पाथर्डी कॅम्प रस्ता, नाशिक) यांनी एमएच १५ सीवाय ९३९५ या क्रमांकाची २४ हजार रुपये किमतीची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दिल्ली दरवाजा येथे उभी केली होती.ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार बागूल करीत आहेत.

वाहनचोरीचा दुसरा प्रकार बागवानपुरा येथे घडला. फिर्यादी अफसर सिद्दिक शेख (रा. मोहंमदी कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, नाशिक) यांनी बागवानपुरा येथील मदरसाच्या मागे एमएच १५ एफझेड २१३९ या क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची सुझुकी ॲक्सिस मोपेड पार्क केली

होती.ही मोपेड चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बाविस्कर करीत आहेत.

वाहनचोरीचा तिसरा प्रकार उत्तमनगर येथे घडला. फिर्यादी चेतन दिलीप आरोटे (रा. शुभम् पार्क, उत्तमनगर, सिडको) यांनी राहत्या घराजवळ एमएच १५ एफएल २६७२ या क्रमांकाची ४० हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

वाहनचोरीचा चौथा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी पद्माकर मधुकर पाटील (रा. वजेश्वरीनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी दि. २८ डिसेंबर रोजी नाशिकरोड येथे देवी चौकातील सेंट्रल रेल्वे पार्किंगमध्ये एमएच १५ एक्स ५७८२ या क्रमांकाची बजाज कावासाकी मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

वाहनचोरीचा पाचवा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी यश सुरेश करमचंदानी (रा.हरिदीप अपार्टमेंट, लोखंडे मळा, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड बस स्टॅण्ड येथे एमएच १५ ईएन ४३६९ या क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोपेड सकाळी पार्क केली होती. ही मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

वाहनचोरीचा सहावा प्रकार वडनेर दुमाला येथे घडला. फिर्यादी नवनाथ दलसिंग राठोड (रा. नॉर्थ रेंज रोड, वडनेर दुमाला, ता. जि. नाशिक, मूळ रा. कोलवाडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी राहत्या घराजवळ एमएच २० जीजी १८३४ या क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेजवळ करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!