काकूंच्या अंत्यविधीसाठी प्रकाश लोंढे तीन तास तुरुंगातून बाहेर

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रभाग क्र. ११ मधील अधिकृत उमेदवार प्रकाश लोंढे यांची काकू भिकूबाई लोंढे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हा न्यायालयाने प्रकाश लोंढे यांना परवानगी दिली होती.घडलेल्या घटनेची गंभिर्य लक्षात घेता सातपूरच्या अमरधाम येथे पोलीस बंदोबस्तामध्ये ते दाखल झाले होते.

सातपूरच्या एका हॉटेलमधील गोळीबार प्रकरणात संशयित म्हणून प्रकाश लोंढे हे सध्या तुरुंगात आहेत. काकूच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना जिल्हा न्यायालयाने तीन तासांची वेळ दिली होती. प्रभाग क्र ११ मध्ये

रिपाइं आठवले गट पक्षाकडून दिक्षा लोंढे,प्रकाश लोंढे,नंदिनी जाधव हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.यावेळी आता रडायचं नाही तर लढायचं अशा घोषणा लोंढे यांनी दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!