नाशिक दिनकर गायकवाड मैत्री करण्यास नकार देणाऱ्या महिलेच्या दोन्ही मुलांचे अपहरण करून इजा पोहोचविण्याची धमकी देणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही पाथर्डी परिसरात राहते आरोपी कृष्णा सोनाजी गोरे (वय २५, रा. खंडेरावनगर, पाथर्डी फाटा) हा सुमारे सात महिन्यांपासून फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत होता. फिर्यादी महिला ही तिच्या मुलाला घरापासून अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये सोडविण्यासाठी जात असते.
आरोपी गोरे याने या महिलेची इच्छा नसताना तिच्यावर मैत्री करण्यासाठी जबरदस्ती केली,तसेच तिचा चोरून पाठलाग केला.पीडित महिलेने आरोपीशी मैत्री करण्यास नकार दिला.याचा राग आल्याने आरोपी गोरे याने फिर्यादीच्या दोन्ही मुलांचे अपहरण करून त्यांना इजा पोहोचविण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी कृष्णा गोरे याला अटक करण्यात आली आहे.
