संगमनेर किशोर वाघमारे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे वित्त व नियोजन उत्पादन शुल्क मंत्री नामदार अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्यातील एक अभ्यासू नेतृत्व उत्तम वक्ता व कायम जनतेचे प्रश्नाला प्राधान्य देणारे असे एक व्यक्तिमत्व हरपले.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याचे दुःख व्यक्त करत अजित पवार यांना शिवसेना सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगरच्या वतीने संगमनेर येथे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे व इतर पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अजित पवार यांच्याबद्दल संगमनेर शहरातील अनेक आठवणींना उजाळा देत अजित पवार हे जनतेतील मनामध्ये राहणारे सतत असणारे एक जनसेवक असून उत्तम प्रशासक व प्रशासनावर पकड असणारे एकमेव नेते होते.
जनतेच्या प्रश्नाला नेहमी प्राधान्य देणारे असे व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्यान महाराष्ट्र राज्याचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावला असून असा नेता परत होणे नाही असे श्रद्धांजलीपर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी संगमनेर तालुकाप्रमुख गौतम रोहम शहर प्रमुख मधुकर वाघमारे महिला आघाडी प्रमुख रूपाली रोहम शहर महिला आघाडी प्रमुख रूपाली रूपाली वाघमारे आदी प्रमुख मान्यवरांचं शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी संगमनेर शहर कार्यालय मध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
