लोणी ज्ञानेश्वर साबळे राज्य मराठी पत्रकार परिषद अहिल्यानगर जिल्हा,अध्यक्ष शहाजी दिघे यांच्या हस्ते कलाकार ज्ञानदेव शिंदे यांचा शालपुष्प सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे राहता तालुका कार्याध्यक्ष संपत तथा आबा निर्मळ,जिल्हा सरचिटणीस - उमेश पन्हाळे तालुका उपाध्यक्ष- ज्ञानेश्वर साबळे पत्रकार शंकर सोनवणे,महेश भोसले,अभिनेते दिग्दर्शक,प्रमोद पंडित उपस्थिती होते.
स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संघटनेच्या वतीने अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांचे अभिनंदन करत आतापर्यंत केलेल्या कामाचं कौतुक करत त्यांना उपस्थितांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.अतिशय दर्जेदार व लोकप्रिय गाण्यांनी त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
खेडेगावातले ज्येष्ठ अभिनेते ज्ञानदेव नरहरी शिंदे हे संगमनेर तालुक्यातील चनेगाव येथील रहिवाशी असून यांनी,एस पी खान एक नई क्रांती हिंदी चित्रपट व,मुलींने शिकवला धडा, कार्यकर्ते जोमात सरपंच कोमात, सुनबाईची करामत, तात्याची कमाल,मराठी वेब सिरीज ऑफ चित्रपटांमध्ये केले.
तसेच,बाबुराव झाला कडक, गणपतीचा आगमन,गुलाबी साडी,शेतकरी राजा,मराठी अल्बम सॉंग मध्ये व अनेक ज्येष्ठ कलाकारा सोबत कामाचा अनुभव व अभिनय क्षेत्राची उत्तम जाण व कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा ही त्यांची जमेची बाजू त्यांच्या नेहमी इतर कलाकारांकडून कौतुक होत असते तसेच अनेक चित्रपटांमध्ये वेब सिरीज मध्ये गाण्यांमध्ये काम केले आहे
