नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी दि.६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन,नाशिक महानगरपालिका मुख्यालय येथील सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी आयोजित विशेष बैठकीसाठी विभागीय आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील,अशी तरतूद आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित सदस्यांमधून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महापालिका सभागृहात विशेष बैठक होणार असून, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पीठासीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील तरतुदीनुसार सभेचे कामकाज पार पाडावे.तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
