अक्षय चेचरे यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार प्रदान

Cityline Media
0
राहाता प्नतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर या ठिकाणी कृषी सेवक आयोजित पुरस्कार सोहळ्यात राहाता तालुक्यातील लोहगावचे भुमिपुत्र युवा उद्योजक अक्षय बाबासाहेब चेचरे यांना राज्यस्तरीय  कृषी मित्र या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास शेतकरी नेते रविकांत तुपकर मा.आमदार अरुण पाटील आमदार अमोल जावळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
प्रसंगी अक्षय चेचरे बोलताना म्हणाले की माझ्या भूमीतील शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टांना तसेच रोज पिकवलेल्या अन्नधान्याला फळांना योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध न होणे योग्य भाव न मिळणे या सर्व गोष्टींचा जवळून अनुभव घेतल्याचा सांगत त्यांनी पुढे म्हटले की 

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान तज्ञांची मार्गदर्शन शेतीतील रोज होणारे बदल वातावरणातील बदल शासकीय योजना व नवनवीन तंत्रज्ञान माझ्या भूमिपुत्रांपर्यंत पोहोचवणे व ते पोचवण्यासाठी मला जे जे प्रयत्न करता येतील ते मी आज करत आहे.असे गुरुकृपा उद्योग समूह राहाता तालुका अध्यक्ष रोमिप इंडिया यांनी मनोगत व्यक्त केले.

आत्ताच गेल्या महिन्यात अक्षय यांना आयसीएआर यांचा फार्मर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल व शेतात दरवर्षी नवनवीन प्रयोग वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न तसेच डाळिंब पिकात उच्च उत्पादन आपल्या शेतातील डाळिंब ईराण ,ईराक बांगलादेश या देशांमध्ये पाठवून चांगला असा शेतीतून मोबदला त्यांनी मिळवला व या तंत्रज्ञानाचे ज्ञानाचे ते इतरत्रही शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. 

कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा
अक्षय चेचरे हे कृषी व्यवसाय मार्फत परिसरातील एकमेव कृषी सेवा असे आहे की या कृषी सेवा मध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविष्ठा तसेच ड्रीप कांदा गोण व इतर जे शेती उपयुक्त अवजारे ट्रॅक्टर पेरणी यंत्र रोटावेटर असे विविध अवजारे त्यांच्याकडे एकच छताखाली मिळवले जातात.आणि या कृषी सेवा केंद्र मध्ये एक विशेष बाब अशी आहे.

परिसरातील शेतकऱ्यांना आपले सरकारी योजनेचे कोणतेही काम असो सातबारा उतारा असो कोणते शासकीय योजनेचे फॉर्म भरणे असो शासकीय योजनेची कोणती माहिती लागत असो या सर्व गोष्टी अक्षय चेचरे यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे व ते नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची योजनेची अडचण आली तर ते वेळोवेळी अधिकाऱ्यांचा संपर्क करून त्याचा निरसन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील शेतकरी खूप असे समाधानी आहे 

प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी मेळा
या संकल्पनेचे मुख्य मार्गदर्शक आमचे गुरुवर्य तसेच मित्र डॉ.प्रशांत नाईकवाडी संस्थापक  रोमीप इंडिया यांच्या विचाराचे आस धरून चालले आज गुरुकृपा उद्योग समूह प्रत्येक वर्षी शेतीतज्ञ वेगवेगळ्या पिकातील मार्गदर्शक या ठिकाणी बोलून परिसरातील व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्या मार्फत एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवला जातो गेल्या सहा वर्षापासून गुरुकृपा उद्योग समूह हा मेळावा राबवत आहे या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद गुरुकृपा उद्योग समूहाला लाभत आहे.या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन नवीन तंत्रज्ञान वातावरणातील होणारे बदल याबद्दल वेळोवेळी माहिती मिळत असते त्याबद्दल परिसरातील व आजूबाजूचे सर्व शेतकरी या कार्यक्रमाबद्दल गुरुकृपा उद्योग समूहाला सदिच्छा देतात.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!