अन्यथा श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरुद्ध समाजवादी आंदोलन छेडणार - जोएफ जमादार
श्रीरामपूर दिपक कदम सध्या ऊस गाळप हंगाम सुरु असल्याने प्रत्येक रस्त्यावर ऊस वाहतूक सुरु आहे,परंतु या ऊस वाहतुकीत ओव्हरलोडचे प्रमाण अधिक असल्याने अपघातास कारणीभूत ठरत आहे तेव्हा अतिरिक्त दाबाने उस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
त्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरला ट्रॅक्टरट्रॉली ऐवजी दोन चाकी (बैलगाडी स्वरुप) जुगाडगाडी चा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ऊस भाराचा समतोल राखला जात नसल्याने रस्त्यावरील खड्ड्यात जुगाड गाडीचा चाक जावून अपघाताची संख्या ही दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढून कित्येक निर्पराधांना आपला जीव गमवावा लागत आहे.
श्रीरामपूर करीता संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रशासनाने वेळीच या ओव्हरलोड ऊस वाहतूक तथा जुगाड गाड्यांवर त्वरित कठोर कारवाई करत निर्पराधांचे जात असलेले बळी थांबवावेत अन्यथा समाजवादी पार्टी च्या वतीने आरटीओ प्रशासनाविरुद्ध उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील समाजवादी चे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
