नाशिक शहरातुन अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरातून एका मुलीसह नऊ वर्षीय मुलाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी महिला ही सिडको येथील आनंदनगर परिसरात राहते. फिर्यादी महिलेची मुलगी दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघून गेली.ती अद्याप घरी परतली नाही. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती मिळून आली नाही. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोंदळे करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार जय भवानी रोड येथे घडला. फिर्यादी महिला ही नाशिकरोडच्या जेतवननगर येथे राहते. या महिलेचा नऊ वर्षे दहा महिने वयाचा मुलगा घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. तो अद्याप घरी परतला नाही. या मुलाला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेत त्याचे अपहरण केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शेजवळ पुढील तपास करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!