नाशिक नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधू लवकरच नाशकात

Cityline Media
0
ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण झाल्यानंतर ९ तारखेला उद्धव ठाकरे,११ तारखेला राज ठाकरे नाशकात

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू असून आज माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण झाल्यानंतर या दोघांच्या प्रचारासाठी नाशिक शहरात ९ आणि ११ तारखेला जाहीर सभांचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.
उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे संस्थापक राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही संयुक्त सभा होणार आहेत. मुंबई आणि मुंबईनजीकच्या मनपांशिवाय केवळ नाशिक महापालिकेसाठी संयुक्त सभा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात

नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची अशी ही पहिलीच संयुक्त सभा ठरणार आहे. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थवर, तसेच मुंबई लगतच्या अन्य मनपांसाठी संयुक्त सभा होणार आहेत. मात्र, मुंबईबाहेर केवळ नाशिक महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होणार असल्याच्या चर्चेने ठाकरेप्रेमी सैनिकांना या सभेची उत्सुकता लागली आहे.

९ जानेवारी आणि ११ जानेवारी अशा दोन दिवसांसाठी सभेची तारीख ठेवण्यात आली असली तरी अद्याप त्याबाबत निश्चिती होणे बाकी आहे. नाशिकमध्ये अखेरच्या टप्प्यात ही भव्य सभा घेऊन उद्धवसेनेसह मनसेसाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!